उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! योजना दूत भरती अंतर्गत बेरोजगार तरुणांना मिळणार व्यवसायाची संधी ; असा करा ऑनलाईन अर्ज : Yojana Doot Bharti 2024

Yojana Doot Bharti 2024 आज आपण आपल्या या लेखामध्ये मुख्यमंत्री योजना दूत ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती राज्यामधील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र योजना दूत या पदाची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

Yojana Doot Bharti 2024

महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे आणि त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी योजना दूत भरती प्रक्रिया सरकारने राबविण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री योजना दूत भरतीच्या माध्यमातून राज्यांमध्ये 50,000 योजना दुत यांची नियुक्ती करण्यात येणार आहे राज्य सरकारकडून ज्या सरकारी योजना सुरू करण्यात येतात त्यांचा प्रचार आणि प्रसार करणे हे काम या योजना दूत यांना करायचे आहे. या भरतीच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना तर रोजगार मिळेल आणि योजना दूत यांना ₹10000 प्रति महिना वेतन देखील दिले जाणार आहे.

Yojana Doot Bharti 2024 दूतांचे मुख्य काम :

  • महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री योजना दूत नावाचे पद निर्माण केले असून या योजनेद्वारे राज्यांमधील 50,000 दूत म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे हा योजना दूत महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहे यामुळे नागरिकांना सरकारच्या योजनेची संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि बेरोजगार तरुणांना योजना दूत म्हणून काम करताना रोजगार देखील मिळणार आहे.
  • महाराष्ट्र सरकारने 9 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री योजना दूत भरतीचा जीआर काढला होता या योजनेच्या माध्यमातून योजना दुत पदांची 50,000 पदे भरली जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://www.rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

योजनेची उद्दिष्टे :

  • महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करणे आणि त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे यासाठी मुख्यमंत्री योजना दूत यांची थेट ग्राम स्तरावर नियुक्ती केली जाणार आहे
  • महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षा यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे
  • राज्यामध्ये कार्यरत प्रशासकीय यंत्रणा मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे

Yojana Doot Bharti 2024 करावे लागणारे काम :

  • Yojana Doot Bharti 2024 योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कामध्ये राहून जिल्ह्यामधील योजनांची माहिती घेतील
  • प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेले ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे आवश्यक आहे
  • योजना दूत राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करत असताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत
  • योजना दूतांनी दिवसभर केलेल्या कामाची माहिती त्याला दररोज ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागणार आहे
  • योजना दूत त्याला सोपवलेले जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करणार नाहीत
  • योजना दूत असे करत असल्यास निदर्शनास आले असता त्याच्या सोबत करण्यात आलेला करार रद्द करून त्याला कार्यमुक्त केले जाईल
  • योजना दूत अनधिकृत रित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन दिले जाणार नाही

नेमणूक प्रक्रिया काय आहे ?

  • नोंदणीची आणि कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क मंत्रालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे
  • पात्र असलेल्या उमेदवारांचे अर्ज पडताळणी केली जाणार आहे
  • ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यांमधील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे
  • जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार आणि जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाची संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा विषयक मूळ कागदपत्रे तपासली जाणार आहेत
  • त्यानंतर प्रत्येक उमेदवारावर सहा महिन्याचा करार केला जाईल तसेच कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवला जाणार नाही
  • जिल्हा माहिती अधिकारी निवड झालेल्या योजना दिवसात योजनांची माहिती संदर्भात समुपदेशन आणि निर्देशांक करतील
  • जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यामधील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना योजना दूत म्हणून पाठवतील
  • मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे सरकारी सेवा म्हणून समजण्यात येणार नाही या नेमणुकीच्या आधारे भविष्यामध्ये शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबद्दलच्या हमीपत्र निवड झालेल्या योजना दूत यांच्याकडून घेण्यात येणार आहे.

Yojana Doot Bharti 2024 पात्रता काय आहे ?

  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा
  • अर्जदाराकडे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असावा
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे
  • अर्जदार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • टीसी किंवा जन्म प्रमाणपत्र
  • हमीपत्र
  • विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज
  • पदवी प्रमाणपत्र

Yojana Doot Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • Yojana Doot Bharti 2024 सर्वप्रथम तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करत असताना योजना दूताच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
  • त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटची होम पेज ओपन होईल त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अप्लाय हा पर्याय निवडायचा आहे
  • त्यानंतर तुमच्यासमोर योजना दूत रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल
  • या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरायची आहे
  • या अर्जामध्ये विचारलेली माहिती अचूक पद्धतीने भरून झाल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • नोंदणी केल्यानंतर तुमच्या समोरील होम पेजवर मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाइन अप्लाय लिंक यावर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर तुमच्यासमोर योजना दूत भरती अर्ज प्रक्रिया ओपन होईल तिथे तुम्हाला त्या योजनेचा अर्ज या पर्याय वर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर तुम्हाला तिथे विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये नाव पत्ता वय शैक्षणिक पात्रता इत्यादी माहिती भरायची आहे
  • त्यानंतर तुमची आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तिथे अपलोड करायचे आहेत
  • बँक पासबुक चे झेरॉक्स ही अपलोड करावे लागेल
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे
  • अर्ज तपासून घेतल्यानंतर तुम्ही अर्ज सबमिट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता
  • अशा सोप्या पद्धतीने तुम्ही योजना दूत भरतीसाठी अर्ज करू शकता अर्ज भरल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुम्ही पात्र ठरल्यास तुमचे मुख्यमंत्री योजना दूत म्हणून नियुक्ती केली जाईल.

यशस्वी स्कॉलरशिप योजनेतून दिली जाते 75,000 पर्यंतची स्कॉलरशिप

FAQ :

योजना दूतांचे मुख्य काम काय आहे

सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांची माहिती घरोघरी पोहोचवणे

योजना दूत साठी पात्रता काय आहे ?

अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे

Leave a Comment