Bandhkam Kamgar Yojana 2024:बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आता बांधकाम कामगारांना मिळणार 60 हजार रुपये बांधकाम कामगारांना त्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी रुपये 60000 मिळणार सदरील योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत राबवली जाते ही योजना राबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत या सुविधा केंद्र मार्फत बांधकाम कामगारांनी ऑनलाइन प्रणाली मध्ये सादर केलेल्या अर्जाची छाननी होऊन बांधकाम कामगारांना त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे रुपये साठ हजार कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी प्राप्त होतात.Bandhkam Kamgar Yojana 2024
बांधकाम कामगार योजना काय आहे
जसे की आपण पाहत आहोत Bandhkam Kamgar Yojana 2024महाराष्ट्र शासनाकडून प्रकारच्या योजनांची घोषणा केली आहे अशाच प्रकारच्या अनेक योजना बांधकाम कामगारांसाठी आणलेल्या आहेत उदाहरणार्थ अवजारे पेटी , गृह उपयोगी भांडे, सुरक्षा संच, विधवा पेन्शन सानुग्रह अर्थ साहाय्य, मोफत आरोग्य तपासणी, त्यापैकी ही स्कॉलरशिप योजना योजना आहे या योजनेत अंतर्गत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांपैकी जे पाल्य इंजिनिअरिंग किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे अशा पाल्यांना दरवर्षी त्यांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून Rs 60,000/- रुपये शैक्षणिक अर्थसहाय्य म्हणून दिले जातात.
अश्या प्रकारच्या अनेक योजना, जसे कि विवाह योजना, प्रसूती योजना, कामगाराच्या मुलीच्या विवाह साठी सानुग्रह अनुदान अर्थसहाय्य, या व अनेक योजना बांधकाम कामगार कार्यालय मार्फत बांधकाम कामगारांसाठी राबविल्या जातात या सर्व योजनांची माहिती आपण येणाऱ्या अनेक लेखा मधून पाहणार आहोत.
तेंव्हा आपण आमच्या योजना कट्टा ह्या ब्लॉग ला नियमित भेट देत राहा जेणे करून Bandhkam Kamgar Yojana 2024 यांच्या विषयी च्या संपूर्ण योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहील
बांधकाम कामगार योजना कोणासाठी आहे
Bandhkam Kamgar Yojana 2024 योजना ही नोंदणीकृत बांधकाम कामगार जे की बांधकाम क्षेत्रातील कामगार आहेत त्यांच्या पाल्यांना अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी लागू आहे. अभियांत्रिकीचे शैक्षणिक वर्ष किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत इंजीनियरिंग पदवी साठी कामगारांच्या पाल्यांना सात हजार रुपये शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते.
बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी:Bandhkam Kamgar Registration
आपण जर बांधकाम कामगार क्षेत्रात किंवा बांधकाम कामगार क्षेत्राशी संबंधित कसल्याही प्रकारचे काम करणारे कामगार असाल तर आपणही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करू शकता नोंदणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन आहे त्यासाठी तुम्हाला आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रासहित महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली Bandhkam Kamgar Yojana 2024नोंदणी करू शकता
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी वयाची अट
आपण जर बांधकाम क्षेत्रात किंवा बांधकाम क्षेत्राशी संबंधित इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल उदाहरणार्थ बांधकाम मिस्त्री, बांधकाम मजूर,प्लम्बर, इलेक्ट्रिशियन, सुतार, फॅब्रिकेशन कामगार, इत्यादी तर आपणही या मंडळामध्ये नोंदणी करू शकता या मंडळामध्ये Bandhkam Kamgar Yojana 2024 नोंदणी करण्यासाठी आपले वय हे 18 वर्षे पेक्षा जास्त व 60 वर्षापर्यंत असू शकते त्यामुळे असे सर्व कामगार ज्यांचं वय 18 वर्षे आहे ते या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करू शकतात.
बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र
बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी मंडळाने ठरवून दिलेल्या नियमानुसार व निकषानुसार जे काही नोंदणीचे कागदपत्र आवश्यक आहेत त्याची आपल्याला पूर्तता करणे बंधनकारक आहे नोंदणी करण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रे लागतातBandhkam Kamgar Yojana 2024
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कामगाराचे आधार कार्ड
- कामगाराचा फोटो
- कौटुंबिक माहितीसाठी कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- राशन कार्ड
- चालू मोबाईल नंबर
वरील प्रमाणे कागदांची पूर्तता करून सर्व कागदपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणीसाठी ऑनलाईन करावेत ऑनलाईन करता वेळेस कामगाराकडे चालू मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे जेणेकरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करते वेळेस ओटीपी प्राप्त होतो तो ओटीपी आपली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्याने बांधकाम कामगाराकडे चालू मोबाईल नंबर असणे आवश्यक आहेBandhkam Kamgar Yojana 2024
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगार हे मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या योजनांना अर्ज करू शकतात
आता आपण 60,000 रुपये मिळणाऱ्या योजनेबद्दल माहिती घेऊ
वरील प्रमाणे आपण जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि जर आपले मुले अभियांत्रिकी शाखेमध्ये पदवीसाठी शिक्षण घेत असतील तर ते बांधकाम कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतात व Bandhkam Kamgar Yojana 2024 या योजनेतून मिळणारे Rs 60000/- शैक्षणिक अर्थसहाय्य याचा लाभ घेऊ शकतात
योजनेसाठी लागणारे कागदपत्र
Bandhkam Kamgar Yojana 2024 Documents Required योजनेसाठी अर्ज करणारे बांधकाम कामगार हे मंडळाकडे नोंदणीकृत कामगार असावेत म्हणजे त्यांच्याकडे लेबर कार्ड असणे आवश्यक आहे तसेच त्यांचे लेबर कार्ड ची नोंदणी सक्रिय असणे आवश्यक आहे असे कामगार या योजनेसाठी त्यांच्या पाल्यासाठी अर्ज करू शकतात परंतु या योजनेसाठी त्यांचे पाल्य हे इंजिनिअरिंग पदवी म्हणजेच अभियांत्रिकी पदवी कोणत्याही ब्रांच उदाहरणार्थ मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्पुटर, इलेकट्रोनिक्स , इलेक्ट्रिकल, मध्ये शिक्षण घेत असणारे असावेत. या योजनेसाठी शैक्षणिक अर्थसाहयाचा अर्ज भरण्यासाठी त्यांना त्यांची शैक्षणिक माहिती द्यावी लागते.
- विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पुरावा लागतो म्हणजेच विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिक्षण संस्था मध्ये शिक्षण घेत आहे त्या ठिकाण चे बोनाफाईड प्रमाणपत्र
- महाविद्यालयाचे किंवा शिक्षण संस्थेचे ओळखपत्र
- महाविद्यालयाचा ईमेल आयडी तसेच
- फोन नंबर आवश्यक आहे
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- कामगाराचे बँक पासबुक
- कुटुंबाचे राशन कार्ड
- लेबर कार्ड इत्यादी
आता विद्यार्थ्यांना मिळणार Free लॅपटॉप : योजनेची संपूर्ण माहिती इथे पहा
बांधकाम कामगार योजना साठी अर्ज करण्याची प्रक्रिया
बांधकाम कामगार मंडळामध्ये सदरील योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे त्यामुळे आपण महा-ई-सेवा केंद्र सीएससी सेंटर कामगार सुविधा केंद्र किंवा चालू इंटरनेट असलेल्या संगणकावरून आपण स्वतः अर्ज करू शकता
योजनेसाठी अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती Bandhkam Kamgar Yojana 2024 Step by Step Process
- सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल
- नंतर योजना या विभागात जाऊन आपली संपूर्ण माहिती भरून या ठिकाणी अर्ज करू शकता
- अर्ज करताना वर सांगितल्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण आवश्यक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे
- त्यानंतर आपल्याला अर्जाच्या मंजुरीसाठी सर्वप्रथम कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी कामगार सुविधा केंद्रात जाण्याची तारीख प्राप्त होईल
- त्याच तारखेला त्याच दिवशी आपल्याला कामगार सुविधा केंद्र मध्ये सर्व मूळ कागदपत्र सहित जाणे आवश्यक आहे
- जेणेकरून आपल्या सर्व कागदपत्रांचे पडताळणी होईल व आपल्याला सदरील योजनेचा लाभ भेटेल